न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- महिनाभरापासुन कोरोनाच्या संकटकाळात अनेक असंघटित कष्टकरी कामगारांना मोठी झळ बसलेली आहे. हाताला काम नाही, पगार नाही, अशा कालावधीमध्ये त्यांना जगता यावे, म्हणून कष्टकरी संघर्ष महासंघाने पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध भागात म्हणजेच वाल्हेकरवाडी, चिंचवड, पिंपरी, निगडी, साने चौक, घरकुल, इंदिरा नगर, विद्यानगर, रामनगर, मोरेवस्ती, चिखली अशा ठिकाणच्या गरजू असंघटित कष्टकरी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे.
नुकतेच चिंचवडेनगर येथे गोरगरिबांना गव्हाचे पीठ, तांदूळ, दाळी, साखर, चहा पावडर, मीठ, तेल, साबण, तिखट व मसाला यांच्या किटचे कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबास वीस दिवस पुरेल एवढे साहित्य व धान्याचे वितरण करण्यात आले आहे. कष्टकऱ्यांच्या अडचणीच्या काळात महासंघ आणि काही दानशूर मंडळीच्या सहकार्यातून हे कार्य करण्यात येत आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, मानव कांबळे, महिला विभाग प्रमुख माधुरी जलंमूलवार, प्रदेश संघटक अनिल बारवकर, नाना कसबे, मीडिया सेल प्रमुख उमेश डोर्ले, शेषराव गायकवाड, राजेश राठोड, राजेश माने, अर्चना कांबळे आदी परिश्रम घेत आहेत.


















