न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी आता केवळ ६ दिवस शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच संपूर्ण परिस्थितीचा आढावादेखील घेणार आहेत. यापूर्वी अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं २० आणि २५ एप्रिल रोजी काहीशा प्रमणात सशर्त सूट दिली होती. कोणत्या ठिकाणी दुकानं सुरू ठेवावी किंवा बंद याचा निर्णय राज्य सरकारांकडे सोपवण्यात आला होता.


















