न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- पिंपरी कॅम्पमधील रिव्हर रोड येथे न्यु सुमित प्रॉव्हिजन अँड जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी (दि. २६) रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने दुकानात आग लागली.
दुकानातील किराणा समान आणि फ्रीज, जिना, दरवाजा असे साहित्य जळाले आहे. संत तुकाराम नगर येथील एक बंब घटनास्थळी दाखल झाला. दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.


















