न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- मधुमेह हा आजार आणि त्यामुळे होणार्या गुंतागुंतीची व्यापकता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने एक बोधवाक्य त्याच्याशी निगडित ठेवलेले आहे. ते म्हणजे – ‘उत्कृष्ट राहा, मधुमेहावर मात करा !‘ उत्कृष्ट राहा यामध्ये – मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवणे, सक्रिय राहणे, आरोग्यदायी खाणे, वैद्यकीय सल्ला पाळणे आणि जर शंका आली तर स्वत:ची तपासणी करुन घेणे या सर्व बाबी समाविष्ट आहेत. आजमितीस ६ कोटी एवढे मधुमेही रुग्ण एकट्या भारतात आढळतात आणि ही संख्या २०३० सालापर्यंत १० कोटी इतकी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाचा विचार करता आजच्या घडीला ३६ कोटी एवढे मधुमेही रुग्ण जगामध्ये आहेत आणि २०३० सालापर्यंत त्यांची संख्या ५५ कोटी इतकी होण्याची शक्यता आहे.
हा झाला भारताचा आकडा, जगभरामध्ये ३५० दशलक्ष लोकांना मधुमेह आहे. जी संख्या येणार्या वीस वर्षांमध्ये दुपटीपेक्षाही जास्त होवू शकते. २०१२ मध्ये १.५ दशलक्ष लोकांचा मृत्यु मधुमेहामुळे झाला. २०१४ मध्ये जगभरात ९ टक्के अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना मधुमेह होता. हा आजार पूर्वी १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये अधिक असायचा. पण आता सगळच बदललय. भारतात ६६.११ टक्के मुलांच्या रक्तातील साखरेची पातळी देखील अनियमित आढळून आली. पॅन-इंडिया संस्थेने ती जाहिरही केली. अर्थात ही आकडेवारी पश्चिम विभागाची आहे. तीन वर्षांच्या एकूण १७,००० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातील ५१.७६ टक्के मुलांच्या शरीरात साखरेची धोकादायक पातळी आढळून आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मधुमेह हे मृत्यूच्या कारणांपैकी सातवे महत्वाचे कारण असेल.
भारतात ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भागात याचे प्रमाण जास्त आहे. भारत हे विकसनशील राष्ट्र असूनही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा आजार वयाने मोठ्या माणसांमध्येच आढळून येत होता. पण सगळ्यात महत्वाची लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे मधुमेंह हा कमी वयातच होवू लागला आहे. परिणामत: त्याचा मेंदू, हृदय आणि मूत्रपिंड या अवयवांवर वाईट परिणाम होवून लवकरच मृत्यु होवू शकतो.
आज असे दिसून येते की मधुमेह सर्वत्र पसरलेला आहे. अगदी घराघरात तो आढळून येतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर अशा या वेगाने सर्वत्र वाढणार्या मधुमेहाचे प्रमाण आपल्याला कमी करायचे आहे आणि या रोगाला पिटाळून लावून त्यापासून पूर्णत: मुक्त व्हावयाचे आहे. आता हेच आपले ध्येय आहे.
वर नमूद केलेली आकडेवारी जरी गंभीर असली तरी मधुमेहाला पिटाळून लावून त्यावर मात करणे (रिव्हर्सल करणे) बर्यापैकी सोपे आहे. ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. शेकडो मधुमेही रुग्णांच्या बाबतीत मधुमेहाचे निवारण झालेले आम्ही पाहिले आहे आणि म्हणून ‘मधुमेहापासून मुक्ती‘ मिळवून घेणे शक्य आहे यावर आमचा दृढविश्वास आहे. तुमची औषधे व इन्शुलिन पूर्णपणे बंद होवू शकते हे आम्ही खात्रीने सांगू शकतो.
गोड नाव असलेला हा कडू मधूमेहाचा आजार कुठे होतो, कसा होतो, याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. मधूमेहाला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत. कित्येक मधुमेही रुग्णांना तर आपल्याला हा आजार आहे याविषयीही माहिती नसते. हा यातील सर्वात मोठा धोका आहे. हा आजार असाच वाढत राहिल तर वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर तो अतिशय खोलवर परिणाम घडवू शकतो. या आजाराचं निदान लवकर झालं नाही तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक्स, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. म्हणूनच हा आजार होवूच नये म्हणून आपण स्वत: काही पावलं उचलणं आवश्यक आहे.
मधूमेह हा एक लाईफस्टाईल विकार आहे. हा एक सायलेंट किलर विकारांपैकी एक आहे. मधूमेह जरी पूर्ण बरा करता येत नसला तरी मधुमेह नियंत्रणात ठेवणं नक्कीच शक्य आहे. यासाठी तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करणं फार गरजेचं आहे. कारण दैनंदिन जीवनात थोडेफार बदल करुन तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता.
मधुमेहासाठी लागणार्या उपचारांचा खर्च बराच आहे. २०११ मध्ये भारताचा ३८ अब्ज डॉलर्स एवढा खर्च केवळ मधुमेहामुळे झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये साधारण कुटुंबांचे जवळपास २५ टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक मोठे आव्हान आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, स्निग्ध आणि अतिगोड पदार्थांचे अतिरिक्त सेवन, वरचेवर वाढत असलेला ताण तणाव, शारीरिक स्थूलता आणि वाढलेली आयुर्मर्यादा यांमुळे मधुमेहाच्या प्रमाणामध्ये अधिकच भर पडत आहे.
येणार्या कुठल्याही प्रकारच्या संकटावर मात करुन अखंड भव्यतेच्या दिशेने वाटचाल करणे हा मानवजातीचा गुणधर्म आहे. या झटपट बदलणार्या काळामध्ये वातावरणात अचानक होणारे बदल, वाढती पाणटंचाई याांरख्या समस्यांबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. असे केले तरच मानवाचा विकास शाश्वततेच्या दिशेने होईल. यासाठीच २०३० सालापर्यंत अपेक्षित असलेला भारतातील १० कोटी आणि एकूण जगातील ५५ कोटी मधूमेहींचा आकडा सत्यात कधीच उतरु नये अशी मी आशा व्यक्त करतो. आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास मधुमेहास परतवून लावणे शक्य आहे. चला तर मग सारे मिळून हे शक्य करुया !
अधिक माहितीसाठी डॉ. भाग्येश कुलकर्णी – संपर्क : 8308845570


















