न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- आज सोमवारी (दि. २७) रोजी पुन्हा एक पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सकाळी अकरानंतर त्या पुरुषाचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान सकाळीच रुपीनगरच्या तिघांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाचे वय २७ वर्ष असून तो मोशीत वास्तव्यास आहे.
यामुळे शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या ८९ वर गेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ६१ वर गेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ४९ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी २८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चौघांचा मृत्यू झालेला आहे.


















