न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- करोना विषाणूचे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. या विषाणूचे रुग्ण पोलीस विभागात आज अखेर ८ जण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची विशेष काळजी घेतली जात असून आठवड्याभरापूर्वीच ५० वर्षांपुढील पोलीस कर्मचार्यांना फिल्डवरील डय़ुटी देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरातील अनेक भागात करोना बाधित रुग्ण आढळत आहे. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून अनेक निर्णय घेतले जात आहे. त्याच दरम्यान मागील आठवड्याभरात ८ कर्मचारी करोना बाधित आढळले आहे. या पार्श्वभूमीवर त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांवर आमचं लक्ष आहे. त्या सर्वांवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे सह पोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी सांगितले.


















