न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- कॉंग्रेसने राष्ट्रीय स्तरावर सुरू केलेल्या हेल्पलाईनद्वारे शहरातील विशेषत: परराज्यातील गरजू व अडचणीत असलेल्या कामगारांची माहिती प्रदेश स्तरापर्यंत व प्रदेश स्तरावरून जिल्हा व शहर स्तरापर्यंत दिली जाते. या माहितीच्या आधारे शहर युवक काँग्रेस संबंधित गरजूनां मदत पोहविण्याचे काम करत आहे.
सरकारकडून लाॅकडाऊन चा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला व मोठ्या प्रमाणात कामगार, मजूर, कष्टकरी, रोजंदारी वर काम करणारा वर्ग व पर राज्यातील कामगार अधिकच खचत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शहर युवक काँग्रेसकडून तीन किलो तांदूळ, दोन किलो पीठ, १ किलो साखर, अर्धा किलो दाळ, अर्धा किलो तेल, चहापत्ती पूडा, ३ मसाला पाकीटे, कपड्याचा व अंगाचा साबण अशा साहित्याचे पॅकेटस् देऊन गरजूनां मदत केली जात आहे”
या कार्यासाठी पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, शहर सरचिटणीस राहूल काळभोर, युनूस बागवान, विरेंद्र गायकवाड, सिध्दार्थ वानखेडे हे सर्व परिश्रम घेत आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

















