न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पूर्णपणे कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचे संशयित व बाधित रुग्णांना समर्पित आहे. रुग्णालयात फिव्हर क्लिनिक व नातेवाईकाकरिता समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. कोरोना बाधित रुग्णाचे संपूर्ण उपचार हे मोफत करण्यात येत असून आवश्यक चाचण्या व उपचार शुल्क रुग्णांचे नातेवाईकांकडून कोणत्याही स्वरूपात आकारले जात नाही. या शिवाय उपचार कालावधी दरम्यान रुग्णाला नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण मोफत पुरविण्यात येत आहे.
कोवीड व्यतिरिक्त अन्य आजार असल्यास सदर व्यक्ती अथवा नातेवाईक यांनी आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, य च स्मृती रुग्णालय, पिंपरी यांचेकडून संदर्भ सेवापत्र घेऊन पद्मश्री डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी येथे वैद्यकीय सेवा मिळवता येईल.
रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी उपचारासाठी येताना आधार कार्ड व रहिवासी असल्याचा पुरावा हा मोबाइल मध्ये फोटो काढून दाखल होताना नोंदणी कक्षात समयी सादर केल्यास नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल. तसेच पूर्वीचे काही गंभीर आजार असल्यास त्या बाबतची कागदपत्रे व औषधे सोबत ठेवावी. यामुळे रुग्णाचे उपचार योग्य दिशेने करणे सुलभ होणार आहे.
कोवीड व्यतिरिक्त अन्य आजार असल्यास सदर व्यक्ती अथवा नातेवाईक यांनी आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, य च स्मृती रुग्णालय, पिंपरी यांचेकडून संदर्भ सेवा पत्र घेऊन पद्मश्री डी वाय पाटील रुग्णालय, पिंपरी येथे वैद्यकीय सेवा मिळवता येईल.
सदर रुग्णांना शासनाच्या विविध योजना उदा. महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपले पिवळे, केशरी शिधापत्रिका, आधार कार्ड, इत्यादी ओळख पत्र आणावे जेणे करून त्यांना इतर रुग्णालयात सुविधांचा लाभ घेता येईल, असे आवाहन वाय . सी. एम. पी. जी.आय. चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले आहे.













