न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ ( एपिडमिक ऍक्ट ) मधील तरतुदीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील खालील नमुद परिसर सील करणे आवश्यक आहे. कोविड – १९ चा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य सामुदायीक प्रसार ( Community Transfer ) टाळण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण याकरीता संपुर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रास कंटेनमेन्ट झोन घोषित केलेले आहे. तरी खालील नमुद परिसर हा Cluster Containment Zone म्हणून सील करणेत येत आहे.
१) सं. नं. २२४ / १, तपोवन मंदिर रोड, पिंपरी गांव (सुखवानी सिटी – वोडाफोन स्टोअर्स – नंद किराणा स्टोअर्स – ज्ञानेश्वर जनरल स्टोअर्स – कापसे चौक माऊली चहा – वाडेकर मिसळ – सुखवानी सिटी
२ ) १६ नंबर बस स्टॉप, काळेवाडी फाटा, वाकड ( प्रोक्स सॉफ्टवेअर प्रा. लि. – औंध रावेत बी . आर . टी . रोड – प्रेम कुल्फी – इंडियन बँक – अक्षय पार्क – प्रोक्स सॉफ्टवेवर प्रा.लि.
उपरोक्त सीमाभागामधील संपुर्ण भाग येथील सर्व संबंधित पोलिस ठाण्यांच्या अंकित असलेला सोबतच्या नकाशात दर्शविलेला परिसर ( परिशिष्ठ १ व २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ) मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२० रोजी रात्री ११. ०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.
त्यानुसार सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख या भागाच्या हद्दी सील करतील. त्यानुसार सदर परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात येत आहे.
१ ) सदर आदेशान्वये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने तसेच शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत.
२ ) उपरोक्त नमुद प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा बंद ठेवाव्यात व केवळ आपली ए. टी. एम. केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत.
पुढील काळात शहरातील रुग्णांची संख्या विचारत घेता टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांत देखील या प्रकारचे निबंध लागू करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी लागणारे जीवनाश्यक साहित्य गर्दी न करता प्राप्त करुन घेऊन पूर्वतयारी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. हा आदेश आज दिनांक २८ एप्रिल, २०२० रोजी महापालिका आयुक्त यांनी जारी केला आहे.













