न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- रुपीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधीत रुग्ण सापडत आहेत. त्याचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे गुरूवार दि. ३० एप्रिल ते रविवार ३ मे पर्यंत सलग चार दिवस तळवडे, रूपीनगर, ज्योतिबानगर, गणेशनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ताम्हाणेवस्ती परिसर कडकडीत बंद राहणार आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक प्रवीण भालेकर म्हणाले की, परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व सेवा बंद राहणार आहेत. फक्त दवाखाने व मेडीकल चालू राहतील. त्यामुळे गरजेपुरत्या जीवनावश्यक वस्तू शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच नागरिकांनी खरेदी कराव्यात.
स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका संगिता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे यांनीही या कालावधीत परिसरातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.













