- सुखद घटना … आज चक्क सात जण कोरोनामुक्त..
- सावधान… पिंपळे गुरवमधील परिसर आज रात्री अकरापासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील दोन तसेच पुण्यातील तीन जणांना आज गुरुवारी कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील एका दहा वर्षांच्या मुलाला आणि ३६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर पुण्यातील तीन पुरुषांचा यात समावेश आहे. पुण्यातील पुरुषांची वये अनुक्रमे ३५, ४८, ८० अशी आहेत. आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉजिटिव्ह ) आलेले रुग्ण पिंपळे गुरव, सदाशिव पेठ, भवानी पेठ व गंजपेठ, पुणे येथील रहिवासी आहेत. त्यामुळे आजपर्यंत सकारात्मक ( पॉजिटिव्ह ) रुग्ण संख्या ११३ वर पोहोचली आहे.
तसेच भोसरी, संभाजीनगर व दापोडी येथिल रहिवासी असलेले सात कोविड – १९ बाधित रुग्ण पिंपरीतील कै. य. च. स्मृ. रुग्णालय व पुण्यातील ससून येथे दाखल होते. दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील तुळजभवानी मंदिर – साठ फुटी रोड – भालचंद्र हॉस्पिटल – निलम सुपर मार्केट – गणेश मंदिर – माऊली हॉटेल – श्री गणेश डेअरी – जयश्री स्वीट्स – तुळजभवानी मंदिर चा परिसर आज मध्यरात्री ११. ०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
आजपर्यंत पी. सी. एम. सी. हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल रुग्ण संख्या ११ वर पोहोचली आहे. पी. सी. एम. सी. हद्दिमधील रहिवासी आजपर्यंत एकुण मयत संख्या ३, तर पी. सी. एम. सी. हद्दीबाहेरील रहिवासी आजपर्यंत एकुण मयत संख्या २ आहे. आज रोजी पी. सी. एम. सी. रुग्णालयात दाखल असलेले कोविड – १९ बाधित रुग्ण ६८ आहेत. तर, आजपर्यंत पी. सी. एम. सी. हद्दिमधील रहिवासी कोरोना ( कोवीड – १९ ) मुक्त रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील रहिवासी परंतु पि. चिं. म. न. पा. क्षेत्राबाहेरील रुग्णालयात दाखल रुग्ण संख्या ११ वर गेली आहे.


















