न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक पदकांची घोषणा करण्यात आली. राज्य पोलीस विभागात कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यातल्या राज्य राखीव पोलिस गट, लोहमार्ग पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग, महामार्ग सुरक्षा विभाग अशा एकूण ८०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे.
पुणे शहर ३२, ग्रामीणमधील १२ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ९ जणांची पोलीस महासंचालक पदकांकरिता निवड करण्यात आली आहे. या ९ जणांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सु. कु. जायसवाल यांनी ही पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी जाहीर केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पदक प्राप्त अधिकारी / कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे :-
पोलीस निरिक्षक शैलेश सुधाकर गायकवाड, सहायक पोलीस निरिक्षक रविंद्र सोमा राठोड, पोलीस हवालदार धर्मराज जनार्दन आवटे, पोलीस हवालदार प्रभावती दिलीप गायकवाड, पोलीस हवालदार राजेंद्र शांताराम शेटे, पोलीस हवालदार अहमद हसन शेख, पोलीस नाईक दीपमाला नंदकुमार लोहकरे, पोलीस नाईक दत्तात्रय मारुती बनसुडे, पोलीस नाईक संदीप मारुती होळकर,


















