न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तोंडाला मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे आवाहन महापालिका सातत्याने करीत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.
गुरुवारी ( दि . ३० ) रोजी ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सांगवी, नवी सांगवी प्रभाग १ व ३२ मध्ये आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, सहा. आरोग्य निरीक्षक सुधीर वायदंडे व सांगवी पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक डी. पी. गुळीग, कर्मचारी पोटे, बो – हाडे यांचे संयुक्त पथकाने कारवाई केली.
यावेळी उघड्यावर थंकणे व मास्क परिधान न केलेबाबत एकूण १८ नागरिकांकडून ८३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. काहीना चक्क दंड बैठका काढायला लावण्यात आल्या. महापालिकेचे सिद्धार्थ जगताप, वरुण कांबळे, विनोद कांबळे, संतोष कदम यांनी ही कारवाई करण्यास सहकार्य केले.


















