सुखद घटना… आज भोसरी आणि दिघीतील तीनजण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- आज शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११३ वर स्थिर आहे.
दरम्यान भोसरी आणि दिघी येथिल रहिवासी असलेले ०३ कोविड १९ बाधित रुग्ण कै. य. च. स्मृ. रुग्णालय येथे दाखल होते. त्यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे.
तसेच आज तनिष्क आयकॉन, दिघी येथिल सुदामा भेळ व पाणी पुरी, पाण्याची टाकी, कृष्णा आंगण कॉम्पलेक्स – ओम साई मिसळ हा आळंदी रोड – सुदामा भेळ व पाणी पुरी चा परिसर आज मध्यरात्री ११ . ०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येणार आहे.
परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


















