- मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहाय्यता निधीस मदत; धनादेश केला महापौरांकडे सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे सांगवीतील सामाजिक कार्यकर्ते महेश भागवत यांचे चिरंजीव ओंकार भागवत याचा चि. वैष्णवी बापूराव डरांगे हिच्याशी ठरलेला विवाह सोहळा अखेर घरातल्या घरात साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन, अगदी मोजक्या दहा जणांच्या उपस्थितीत, सर्वांनी मास्क घालून व सामाजिक अंतर राखत हा विवाह सोहळा सांगवीतील भागवत यांच्या घरी संपन्न झाला. विशेष बाब म्हणजे सामाजिक दायित्वाचे भान राखत साधेपणाने केलेल्या या विवाहामुळे जो खर्च वाचला त्याबद्दल मुख्यमंत्री सहाय्यता निधी व प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी २५,००० असे एकूण ५०,००० रुपयांच्या मदतीचा धनादेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक जाणीवेबद्दल महापौरांनी कौतुक करत नवदांपत्याला आशिर्वाद दिले.


















