न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- शुक्रवारी सकाळी दहाची वेळ. . . एका धर्मगुरूंना हातावर पोट असलेल्या व्यक्तीचा फोन येतो. . . मी बिगारी काम करतो. .माझ्या घरात काहीच अन्नधान्य नाही…. परिसरातील दुकाने बंद आहेत. मला काही मदत करा…
कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या ४० दिवसांपासून लॉकडाउनमध्ये आहे. त्यामुळे जिवनावश्यक बाबी वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहरातसुध्दा कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाची संख्या गेल्या काही दिवसापासून झपाटयाने वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरामध्ये शासनाकडून मिळालेल्या सुचना – नियमाची काटेकोरपणे अमलबजावणी केली जात आहे. संचारबंदीचा फटका उद्योग – व्यवसाय, व्यापारी यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. जे लोक मोलमजुरीकरून रोजच्या मजुरीतून संसारगाडा हाकत आहेत, त्याना सर्वाधिक हालअपेष्टाना सामोरे जावे लागत आहे. हाताला काम नसल्यामुळे जवळचा पैसा सपला, जगण्यासाठी मुठभर धान्य कसे मिळणार असा प्रश्न त्याना पडला आहे. नाही म्हणायला, शासनाकडून रेशनदुकानातून धान्य, काही ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरातील स्वयसेवी संस्था, उद्योजक, दानशुर व्यक्ती याच्याकडूनही शक्यती सर्व मदत केली जात आहे. परंतु, अशाही परिस्थितीत काही जणाना अडचणीचा सामना करावा लागतो. असाच हृदयद्राव अनुभव शुक्रवारी पाहण्यास मिळाला.
एका धार्मिक स्थळाच्या धर्मगुरूना बिगारी काम करणा-या व्यक्तीने फोन केला. मी भोसरीतील धावडेवस्ती येथे राहतो. माझ्या घरातील धान्य संपले असून माझ्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. कृपया काही मदत करावी, अशी आर्त विनवणी त्याने धर्मगरूकडे केली. त्याच्यावर आलेल्या कठीण प्रसगाची दखल घेउन धर्मगुरूनी जमेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, संचारबदीमुळे धर्मगुरूना स्वतः भोसरी येथे जावून त्या कामगाराला मदत करणे शक्य नव्हते. त्यांनी त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि त्या कामगाराची व्यथा सांगितली. नियंत्रण कक्षातील कर्मचा-यानी संबधीत व्यक्ती कोठे राहते, त्याचे नाव, फोन नंबर याची माहिती घेउन निश्चित मदत मिळेल, आपण चिंता करू नये, असे आश्वासन धर्मगुरूंना दिले.
पोलिस नियंत्रण कक्षाने लगोलग ही माहिती भोसरी पोलिस ठाण्यास कळवली माहिती मिळताच भोसरी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिका-यांनी दोन पोलिस कर्मचारी देशमुख आणि कांबळे यांना धावडे वस्ती परिसरात पाठवले. त्यांनी फोन करून संबधीत व्यक्तीस बोलावून विचारपूस करून माहिती घेत धीर दिला. त्या व्यक्तीला घेउन पोलिस जवळच असलेल्या एका किराणा दुकानदाराकडे गेले. रोज लागणा-या जिवनावश्यक वस्तू त्याला घेउन दिल्या. घेतलेल्या वस्तूचे बिल देण्यासाठी त्या व्यक्तीने खिशातील पैसे काढले. मात्र, पोलिसानी दुकानदाराला त्याच्याकडून पैसे घेउ नकोस अशी खूण केली. तरीही त्या व्यक्तीने पैसे देण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे दोन्ही पोलिस कर्मचारी म्हणाले तुझ्यावरील ओढवलेल्या परिस्थितीची आम्हाला जाणीव आणि कल्पना आहे. बिलाचे पैसे आम्ही देउ, हे पाहून त्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीचे डोळे पाणावले. तो म्हणाला साहेब, या संकटाच्या काळात तुम्ही मला जी मदत केली, हे पाहून तुम्ही माझयासाठी देवदूतच आहात. या प्रसंगाची माहिती त्याने धर्मगुरूना सागितली. धर्मगुरूही म्हणाले हे कोरोना वॉरियर्स ‘ नसून प्रत्यक्षात अडचणीत सापडलेल्याच्या मदतीला आलेले साक्षात ‘ देवदूत आहेत.


















