न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीतील ‘एड्स’ वर संशोधन करणा-या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणजेच ‘नारी’ या संस्थेला कोरोना तपासणीसाठी ‘आयसीएमआर’ कडून दोन दिवसांपूर्वी परवानगी मिळाली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी आयसीएमआरकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान महापालिकेने कोरोना तपासणीसाठी शुक्रवारी (दि. १) रोजी आठ संशयितांचे नमुने नारीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
त्यामुळे यापुढे देखील नियमितपणे नारीकडे कोरोना चाचणीसाठी संशयितांचे नमुने पाठवले जाणार आहेत. विशेषतः नारीची कोरोना तपासणीची क्षमता अजून मर्यादित आहे. महापालिकेकडे दिवसभरात १०० हून अधिक संशियत तपासणीसाठी येत असतात.
त्या मानाने नारीची तपासणी क्षमता कमी आहे. मात्र, पुण्यातील एनआयव्ही संस्थेवरील काहीसा भार नक्कीच हलका होणार आहे. तसेच भोसरीतील व वायसीएम रुग्णालयातील संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल कमी वेळेत महापालिकेला प्राप्त होतील व वेळेची बचत होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.


















