न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे. २०२०) :- कोरोनाला हरवण्यासाठा तिसरा लॉकडाउन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी राज्य सरकारनं जारी केल्याचं टि्वट एएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे.
एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारनं आता रेडझोनमधील दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहेत. त्यात दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण, रेड झोनमध्ये असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही सूट लागू नसेल. तेथील दुकाने सध्या उघडता येणार नाहीत.
त्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आता कुरिअर सेवा सुरू होईल, पोस्ट सुरू होतील, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सुरू होतील तसेच काही ठिकाणी खासगी व सरकारी कार्यालयेही सुरू होतील. विशेष म्हणजे, काही ठिकाणी आंतरजिल्हा बसेसही सुरू होणार आहेत.
झोननुसार कोणत्या जिल्ह्यात काय सुरू होणार याची संपूर्ण यादी एकदा वाचा…



















