- तर, कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ४२ हजार ५५३ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे २ हजार ५५३ नवे रुग्ण आढळले असून, ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४२ हजार ५५३ वर पोहचली आहे.
रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले ११ हजार ७०७ जण तर करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ हजार ३७३ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.


















