- कासारवाडी, खराळवाडीतील दोन रुग्ण आज कोरोनामुक्त
- चऱ्होली व पिंपळे गुरवचा काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज नव्याने एका ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुण्यातील ४९ वर्षीय महिलेची व ३२ वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १२४ वर गेली आहे. अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण च-होली, बोपोडी, ताडीवाला रोड, पुणे येथील रहिवासी असून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल आहेत. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात ५५ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.
कासारवाडी व खराळवाडी येथिल रहिवासी असलेले दोन कोविड १९ बाधित रुग्ण वायसीएम रुग्णालय येथे दाखल होते. त्यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५५ वर पोहोचली आहे.
तसेच आज च-होली येथील ( च-होली ब्रु रोड – हायस्कुल रोड – हिंदवी एन्टरप्रायजेस – रोहन झेरॉक्स सेंटर-च-होली ब्रु. रोड) व पिंपळे गुरव येथील (भक्ती दर्शन सोसायटी – पुष्पांजली अपार्टमेंट – पाण्याची टाकी – काटेपुरम चौक – कृष्णा चौक – अखिल क्रांतीचौक – एम . के . चौक – शिंदेशाही हटिल – भक्ती दर्शन सोसायटी ) येथील परिसर मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येणार आहे.
सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.


















