न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- महाराष्ट्रात मधमाशा चावणे common आहे. मधमाशांचा हल्ला कोणावरही होऊ शकतो. अगदी गिर्यारोहकांना प्रस्तरारोहकांना तसेच पर्यटकांनाही मधमाशा कडाडून चावल्या आहेत. मात्र, देहूरोड येथील ईराअण्णा शेट्टी हे भाजी आणण्यासाठी आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता गेले होते. त्यावेळी त्यांना गांधील माश्या चावल्यामुळे गंभीर जखमी झाले.
त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेट्टी यांना हृदयविकाराचाही त्रास होता. तसेच यापूर्वीही त्यांना मधमाश्या चावल्याने ते गंभीर जखमी झाले होते.


















