न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- राज्यात मुंबईपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. करोनामुळे अनेक वसाहती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी पुण्यात आणखी तिघांचा करोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहेत. यात एका ११ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तीन मृत्यूमुळे करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ११८ वर गेली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात सध्या २ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पुण्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.


















