- शिवसेना संघटक हरेश नखाते व विभाग संघटक अंकुश कोळेकर यांचा स्तुत्य उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्याची जाणीव ठेवून शिवेसनेचे चिंचवड विधानसभा संघटक हरेश नखाते आणि रहाटणी-श्रीनगर विभाग संघटक अंकुश कोळेकर यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि सुरक्षा किटचे वाटप केले आहे.
आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त जाणीवेतून व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हरेश नखाते व अंकुश कोळेकर या दोघांनीही आपापल्या वाढदिवसाचा खर्च टाळून गरजूंना मदत केली.
सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाने त्रस्त असून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून त्यांना मदतीची गरज आहे. त्याचबरोबर समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र सेवा बजविणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही सुरक्षा महत्वाची आहे. हीच गरज ओळखून नखाते व कोळेकर यांनी पुढाकार घेऊन रहाटणी, थेरगाव, काळेवाडी येथील महापालिकेच्या सफाई विभागाचे कर्मचारी, पेट्रोल पंपवर काम करणारे कर्मचारी, विविध ठिकाणचे सुरक्षारक्षक या सर्वांना सुरक्षा किटचे वाटप केले.
‘आपल्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी सामाजिक जाणीव ठेवून गरजवंतांना केलेल्या मदतीमुळे एक प्रकारे समाधान मिळते’ अशी भावना यावेळी नखाते व कोळेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, नरसिंग माने, गणेश वायभट, राजुभाऊ शिंदे, शिवाजी घिगे, शिवसेना विभागप्रमुख प्रदीप दळवी, अनिल पालांडे, प्रजाक नढे, बाळासाहेब येडे, बाळासाहेब गावडे, संजय आंब्रे, शिवसेना शाखाप्रमुख कानिफनाथ तोडकर, महादू बिक्कड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


















