न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेली संचारबंदी लक्षात घेता, सामाजिक कार्यकर्ते विजय वडमारे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावशक खर्च टाळून, ५० गरजूंना ७ दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले. त्यामध्ये ५ की. गहू, ५ की तांदूळ, १ की तेल, शेंगदाणे १ की, १ की पोहे, तूरडाळ १ की, १ की मिरची पावडर, हळद पॉकेट, १ की बेसन या किटचा समावेश आहे.
एवढेच नाही तर, विजय वडमारे हे २०११ पासून समाजसेवा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या ३ वर्षात विधवा व घटस्फोटीत ३०० महिला भगिनींना मोफत पेन्शन सेवा चालू करून दिली. तसेच, २०० अपंगाना व्यवसाय करण्यासाठी ‘उध्योग आधार’ व ‘शॉप अॅक्ट’ कार्ड मोफत काढून देण्यात आले.
तसेच, २०११ ते २०२० पर्यंत २० हजार पेक्षा जास्त जनतेच सेवारुपी मोफत आधार कार्ड काढून दिले व अनेक सारे स्वच्छता अभियाने त्यांनी स्वतः राबविले. श्री क्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या माऊलींच्या दिंडीमध्येसुद्धा त्यांनी स्वच्छता अभियान राबून अस्वच्छतेपासून पर्यावरणाला व समाज्याला होणाऱ्या हानीपासून वाचवले आहे. अशा प्रकारचे अनेक सामाजिक कार्य त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा अनावशक खर्च टाळून केले आहेत.


















