- सुखद घटना… खराळवाडी व दापोडीतील दोनजण कोरोनामुक्त…
- आज मध्यरात्रीनंतर चिंचवडमधील संभाजीनगर व मोशी परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर कोरोनाचे लघुकेंद्र बनले आहे. दिवसेंदिवस शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आज मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालात रुपीनगर व मोशी परिसरातील तीनजणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. पुरुषांचीवये अनुक्रमे २६ व ५५ असून महिलेचे वय २५ वर्षे आहे. हे तिघे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३५ वर पोहोचली आहे. तर
दरम्यान आज खराळवाडी व दापोडी येथिल रहिवासी असलेले दोन कोविड-१९ बाधित रुग्ण वायसीएम रुग्णालय येथे दाखल होते. त्यांची दोन्ही वेळची
कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५७ वर गेली आहे. तर, आजपर्यंत पी.सी.एम.सी. हद्दीबाहेरील रहिवासी कोरोना (कोवीड-१९) मुक्त रुग्णांची संख्या ०२ वर पोहोचली आहे.
तसेच आज संतज्ञानेश्वर हौसिंग सोसायटी, संभाजीनगर, चिंचवड येथील रोटरी क्लब ऑफ चिंचवड – संभाजीनगर रोड – रॅडीश हॉटेल – शिवाजी पार्क लिंक रोड – मनसुख सुपर मार्केट – अंब्रेला गार्डन रोड – नवमी प्युअर व्हेज – निगडी भोसरी रोड – रोटरी क्लब ऑफ चिंचवड व बनकरवस्ती, मोशी येथील टाय स्ट्रीट जाधववाडी रोड – बनकरवस्ती रोड – बनकरवस्ती रोड – नाशिक रोड – मोशी टाय स्ट्रीट जाधववाडी रोड परिसर मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


















