- डॉक्टरने केल्या होत्या तीनशे रुग्णांच्या तपासण्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे या डॉक्टर रुग्णाने शहरातील एका खासगी रुग्णालयात आपली कोरोना टेस्ट केली होती त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला याबाबत कळविले आहे
त्यानंतर या रुग्णाची नोंद महापालिकेकडे करण्यात आली आहे हा रुग्ण काळेवाडीतील विजयनगर परिसरातील आहे या डॉक्टर ने जवळपास तीनशेच्यावर रुग्णांची क्लिनिकमध्ये तपासणी केली आहे त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे















