- पिंपळे गुरव, तळवडे, खराळवाडी येथील रुग्णांचा समावेश
- सुखद घटना… आज थेरगाव आणि रुपीनगर येथील दोघे कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल संशियत रुग्णांपैकी आज गुरुवारी सायंकाळी आणखी चौघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात एका सहा महिन्याच्या मुलीसह १६ व २८ वर्षीय महिलेचा व एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
त्यामुळे शहरात १५१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ७७ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण पिंपळे गुरव, तळवडे, खराळवाडी येथील रहिवासी आहेत.
तसेच थेरगाव आणि रुपीनगर येथिल रहिवासी असलेले दोन कोविड – १९ बाधित रुग्ण वायसीएम रुग्णालय येथे दाखल होते. त्यांची दोन्ही वेळची कोरोन चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे.















