न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- तळेगाव स्टेशन येथे एका ३४ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तळेगाव स्टेशन भाग आणि तीन किलोमीटरच्या परिसरातील शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
संबंधित परिचारिका शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहेत. तळेगाव स्टेशन भागात त्या वास्तव्यास आहेत. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची सोमवारी ( दि . ४ ) आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात या महिलेचा तपासणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि पथकाने तळेगाव स्टेशन परिसर सील केला आहे. सदरच्या महिलेवर औध येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.















