न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- फिर्यादी यांच्या ३३ वर्षीय पत्नीचे आरोपी अमित जगताप याच्याशी प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीसोबत वेळोवेळी फोटो काढले. त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने त्यास नकार दिला.
त्यामुळे आरोपी अमित जगताप याने तिचे फोटो व कॉल रेकॉर्डची माहिती नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. वारंवार देण्यात येणाऱ्या धमकीला कंटाळून १६ एप्रिल रोजी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना प्राधिकरण, निगडी येथे घडली. याप्रकरणी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित जगताप (पूर्ण नाव माहित नाही रा. रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत विवाहितेच्या पतीने गुरूवारी (दि. ८) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















