न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर कोरोनाने बाधित आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच आत पाळीव प्राणी देखील शहरात असुरक्षित होऊ लागले आहेत.
वाल्हेकरवाडी परिसरातील मौनीबाबा आश्रमाजवळ गुरुवारी सायंकाळी कुत्र्याची तीन पिल्ले सहा फूट अरूंद खोल खड्ड्यात पडली. ती पिल्ले मदतीसाठी आर्त हाक देत होती. ही आर्त ऐकून परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागास संपर्क साधला व त्यांना माहिती दिली.
अग्निशामक विभागाच्या जवानांनी अरुंद जागेत रस्सीच्या माध्यमातून खड्यात पोहोचून या पिल्लांना सुखरूप बाहेर काढले व त्या पिल्लांना जीवदान दिले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.















