न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- कोरोनाचे संकट सध्या सर्वत्र आहे. या प्रकारच्या संकटांच्या निमित्ताने आपल्या शहरात कॅन्सरवर उपचारासाठी रुग्णालय असणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव या ठिकाणी पिं. चिं. मनपा मार्फत रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. शहरातील एकंदरित वैद्यकिय सुविधांचा विचार करुन, हे रुग्णालय कॅन्सर या आजाराच्या उपचारासाठी महापालिकेने राखीव ठेवावे.
त्याचबरोबर कॅन्सरसाठी गेली अनेक वर्ष योगदान देणा-या टाटा सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी सारख्या संस्थेकडे चालविण्यास द्यावे. त्यामुळे ख-या अर्थाने सेवेचा उद्देश सार्थ होईल.
थेरगाव येथील अंतिम टप्प्यात आलेले रुग्णालय कॅन्सर उपचारासाठी दिल्यास, लवकरात लवकर त्या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय सुरु होऊन सर्व स्तरातील गरजू गरिबांना हे रुग्णालय जीवन संजीवनी ठरु शकेल, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निविद्नाद्वारे केली आहे.


















