- सुखद घटना… आज १५ जण कोरोनामुक्त, संख्या पोहोचली ७७ वर…
- आज मध्यरात्रीपासून भोसरी, काळेवाडी, थेरगाव, कस्पटे वस्ती चा काही परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शहरात आज शनिवारी सकाळी तळवडे येथील २८ वर्षीय महिलेसह, सायंकाळी आलेल्या अहवालानुसार ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सायंकाळच्या अहवालात आठ पुरुष, तसेच सहा महिन्याच्या बाळासह दोन महिलांचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे.
पुरुषांची वयं अनुक्रमे ५८, ६३, ३१, ६०, ४०, २९, ३२, ८३ अशी असून महिलांची वयं ६, २५, ४५ वर्षे अशी आहेत. आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण रुपीनगर, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी, थेरगाव, च-होली येथील आहेत. तसेच पुण्यातील नानापेठ व खडकीतील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
दरम्यान आजपर्यंत शहरातील सकारात्मक पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १६७ वर पोहोचली असून, पिंपरी चिंचवड शहरातील ७७ रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
तसेच महापालिकेच्या रुग्णालयात दाखल दिघीतील पंधरा कोरोनाग्रस्तांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७७ वर पोहोचली आहे.
दरम्यान आज गुरुविहार (गुरुविहार कॉलनी गार्डन – महादेव मंदिर – पुणे नाशिक हायवे – एम. बी. आय. एटीएम – प्रभाग क्षेत्रिय कार्यालय – भोसरी रोलर केटर रिंग गुरुविहार कॉलनी गार्डन) लांडगेनगर, भोसरी ( ऑक्का गणेश कॉर्नर – स्पेरोनी इंडिया प्रा . लि . – पुणे नाशिक हायवे – हॉटिल क्लाऊड ९ – स्वस्तीक ज्वेलर्स – ऑक्षा गणेश सोसायटी – ऑका गणेश कॉर्नर ) तापकीर चौक, काळेवाडी ( हॉटेल गुरुदत्त – एस . बी . आय . एटीएम – शिवसेना कार्यालया समोर – हनुमान सुपर मार्केट – ओंकार लॅमिनेटम् – बेबीज इंग्लिश स्कुल – तुळजाभवानी मंदिर – बेंगलोर अय्यंगार बेकरी – हॉटेल गुरुदत्त ) दत्तनगर, थेरगाव ( पिंक लिली सोसायटी – पवना नदी गंगा आशियाना मागील मोकळी जागा – गंगा आशियाना ‘ आय ‘ बिल्डींग – गंगा आशियाना के बिल्डींग – पिंक लिली सोसायटी ) कस्पटे वस्ती, वाकड ( सोनिगीरा केसर बिल्डींग ‘ ७ ‘ – एलियन्म हटिलसमोर – कस्पटे वस्ती रोड – छत्रपती रोड – पंजाब नैशनल बैंक – सोनिगरा सोसायटी रोड – सोनिगरा केसर बिल्डींग
हा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.


















