न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- पुण्यात करोनानं सर्वात कमी वयातील बळी घेतला आहे. एका १३ महिन्यांच्या मुलीचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे. पुण्यातील वारजे परिसरात वास्तव्याला असलेल्या कुटुंबातील एका १३ महिन्यांच्या मुलीला ४ मे रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दाखल करण्यात आल्यानंतर तिची चाचणी करण्यात आली. यात तिला करोनाचा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं. या मुलीला कुपोषणाबरोबरच अनेमियाचाही त्रास होता. त्यातच रविवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


















