- कोविड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- करोना व्हायरसविरोधातील लढ्यामध्ये भारताने यश मिळवले आहे. भारताने कोविड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (NIV) पहिली स्वदेशी करोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोविड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट तयार केली आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात करोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे ते म्हणाले. अडीच तासांमध्ये ९० चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे अशी माहितीही त्यांनी दिली.


















