न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- किरकोळ कारणावरून पुतण्याने चुलतीला दगडाने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १०) पाटीलनगर, चिखली येथे घडली आहे. आशा रामभाऊ मोरे ( ५४, रा. पाटीलनगर, चिखली) असे जखमी महिलेचे नाव आहे.
त्यांनी या प्रकरणी रविवारी (दि. १०) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हिरामण गुलाब मोरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी आशा रविवारी सायंकाळी त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. त्यावेळी त्यांचा पुतण्या हिरामण हा फिर्यादीच्या घराच्या भिंतीला लावलेले प्लास्टिकचे कागद ओढून काढत होता. फिर्यादी यांनी आरोपीला याबाबत जाब विचारल्याने हिरामण याने त्यांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली.












