न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४४० पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये ३२ अधिकारी आणि ४०८ कर्मचारी यांचा समावेश आहे. चाचणी केलेल्या सर्व पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
त्याचबरोबर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पोलीस बांधवांच्या कुटुंबियांसाठी पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत शहरातील चार रुग्णालयांना मान्यता दिली आहे.
त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांना कोरोनाचा लागण होऊ नये, तसेच त्यांच्या तपासणीसाठी पोलीस आयुक्तांनी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे.













