- कोरोना योद्धा… सर्व आरोग्य परिचारिकांना मानाचा मुजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- आज १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. क्राइमियन युद्धा दरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना “लेडी विथ द लॅम्प” (The Lady with the Lamp) असे म्हणत.
आज जगात Covid-19 मध्ये आपल्या प्राणाची फिकीर न करता कोरोना रुग्ण बरा कसा होईल, त्यासाठी प्रयत्न करणार्या सर्व आरोग्य परिचारिकांना मानाचा मुजरा…













