न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- भोसरीतील लांडेवाडी येथे राहणारा मुलगा रविवारी रात्री साडेअकरा वाजता घरी आला. त्याने येताना दारू आणली होती. त्यामुळे त्याच्या आईने मुलाला घरात खायला काही नाही अन तू दारू का घेऊन आलास, असे म्हटले. याचा राग आल्याने मुलाने आईला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
त्यानंतर धारदार सत्तुरने आईच्या हातावर वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. तसेच त्याने आईचा नातू आकाश याच्यावर देखील वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १०) लांडेवाडी, भोसरी येथे घडली. या प्रकरणी जखमी आई कौशल्या रंगनाथ झाडे (६५) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनराज रंगनाथ झाडे (वय ३८, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी धनराजला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.













