- पिंपळे निलख आणि दिघी परिसरातील दोन रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार चऱ्होली येथील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. रुपीनगर नंतर एकाच दिवशी चऱ्होलीत सर्वात जास्त संख्येने कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चऱ्होलीतील एका ३३ वर्षीय पुरुषाला आणि ३ वर्षीय बालकाला तर, महिलांमध्ये २४, २५, २८, ५४ वर्षीय महिलांचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १७४ वर पोहोचली आहे. तर ५२ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
तसेच शहरातील पिंपळे निलख आणि दिघी परिसरातील दोन रुग्ण पुण्यातील नायडू आणि औंध रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची दोन्ही वेळची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.













