- MSME क्षेत्रालाही कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा कुठल्या-कुठल्या क्षेत्राला फायदा होईल त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दिली. उद्योग आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीचा भार उचलणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे १२ टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे.
मार्च, एप्रिल आणि चालू महिन्यात सरकार हा भार उचलत आहे. पुढचे तीन महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही सरकारच पीएफचा पैसे भरणार आहे. ३.६७ लाख कंपन्या आणि ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. यामुळे उद्योगांना २५०० कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदतही ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही घोषणा आहे.
MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. १०० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या आणि मध्यम व्यवसायांना आत्मनिर्भर योजनेतून कर्ज देण्यात येईल २५ कोटींपर्यंत कर्ज मिळण्याची सोय या योजनेत आहे. या कर्जासाठी गॅरंटीची आवश्यकता भासणार नाही. MSME सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या बदलली छोटे उद्योग प्रगती करुन मोठे होऊ शकत नव्हते. कारण त्यांना छोटे उद्योग म्हणून मिळणारे फायदे त्यांना उलाढाल वाढल्यावर मिळत नाहीत आणि ते मोठ्या स्पर्धेत टीकू शकत नाहीत. म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची MSME ची व्याख्या बदलली उत्पादन हा निकष असणार नाही. उलाढाल आणि गुंतवणूक यानुसार सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांची वर्गवारी करण्यात येईल. त्यानुसार त्यांना सेवा उद्योगांनाही हेच नियम लागू होणार. आधीचे निकष बदलून ते आता वाढवण्यात आले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं.
२० लाख कोटींचं पॅकेज करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांशी, विविध तज्ज्ञांशी चर्चा केली अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे देशाच्या विकासासाठी जाहीर केलेलं पॅकेज आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं जाहीर केलं. या २० लाख कोटींच्या पॅकेजचे तपशील काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सगळ्या देशाचं या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं. आज उद्या आणि परवा अशा तीन भागांमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहेत.













