न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही महापालिकेने शहरातील काही परिसरात लॉकडाऊन शिथिल केले. त्याचा शहरातील नागरिक फायदा उचलत रस्त्यावरील गर्दी वाढवीत आहेत.
पिंपरी कॅम्प परिसरात देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपरी कॅम्पातील मार्केट व शगुन चौकातील रस्ते मंगळवारी रात्रीपासून पत्रे लावून बंद केले आहेत. परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. रस्ता अडवून बाहेरच्या नागरिकांना परिसरात येण्यास मज्जाव केला आहे.













