न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध कामांसाठी येणार्या र.रु. ३ कोटी ९२ लाख इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
महानगरपालिकेचे सर्व्हर, फायरवॉल, स्टोअरेज यांची १ वर्ष कालावधी करीता वॉरंटी वाढविण्यासाठी येणा-या र.रु. ४८ लाख ६८ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. पिंपळे सौदागर पुल ते दापोडी एमएस गुरुत्व वाहिनी यांनी वरील देखभाल दुरुस्तीची कामे करणे, वॉल बदलणे व इतर अनुषंगिक कामे करणे कामी येणा-या ३१ लाख ८८ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
क प्रभागातील नेहरुनगर व उपविभाग, भोसरी, मोशी, इंद्रायणीनगर उपविभागात आवश्यकतेनुसार डी.आय.पाईप व एच.डी.पी.ई. पाईप लाईन टाकणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या र.रु. ३५ लाख १० हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.३ मधील मोशी गावठाण, डुडुळगाव, साई मंदिर, भोसरी येथील शास्त्री चौक परिसरातील चेंबर्सची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने देखभाल व दुरुस्तीकामी येणा-या २५ लाख १६ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली.













