न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष लोंढे व सदस्यांनी आज बुधवारी कोरोना वार रूमची पाहणी केली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वांना कोरोना वार रूम प्रणालीची सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपमहापौर तुषार हिगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य संतोष कांबळे, पंकज भालेकर, तुषार कामठे, राजू मिसाळ, सागर गवळी, नगरसदस्य भिमाताई फुगे, आरती चौंधे, सुलक्षणा धर, वैशाली काळभोर, झामाबाई बारणे, सुवर्णा बुर्डे, पोर्णिमा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.













