न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने मोशीत आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने जवळपास चार हजार गरजूंना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
‘ मदत नव्हे कर्तव्य ‘ या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक दोन भागातील गरजू कुटुंबांना आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक अन्न धान्य कीटचे वाटप करण्यात येत असल्याचे नगरसेवक संत बोराटे यांनी सांगितले. या संकटाच्या प्रसंगात कुठलाही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, असेही बोराटे म्हणाले.


















