न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- घर सोडताना साफसफाई केली नाही व घरभाडेही दिले नाही, या कारणावरून घरमालकाने भाडेकरूच्या घरात घुसून कुटुंबीयास मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी वाल्मिक गोनीनाथ जगताप (४८, रा.पंतनगर, जाधववाडी, चिखली) यांनी मंगळवारी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मंगल धनवे, तुषार धनवे, मंगल धनवे यांचा पती आणि अन्य एक अनोळखी महिला व इतर सात ते आठ अनोळखी पुरुष (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वाल्मिक हे आरोपींकडे भाड्याने राहण्यास होते. त्यांनी घर सोडताना खोलीची साफसफाई केली नाही. तसेच, उर्वरित घरभाडेही दिले नाही. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. मंगळवारी दुपारी आरोपी मोटार तसेच तीन दुचाकीवरून फिर्यादी वाल्मिकी यांच्या घरी आले. त्यांनी फिर्यादी यांची पत्नी मुले आणि मुलीला मारहाण केली. तसेच, मोटारीच्या काचा फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


















