न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जग अस्ताव्यस्त झाले आहे. अनेकांच्या हाताला कामे नाहीत, हातावर पोट असणाऱ्या घरांत आर्थिक विवंचना भासूण संसाराची घडी विस्कटलेली पाहायला मिळत आहे. संचारबंदीच्या काळात त्यांचीही चूल पेटावी या हेतूने एका पंधरा वर्षाच्या मुलाने आपल्या वाढदिवसानिमित्त समाजातील हातावर पोट असणाऱ्या १०० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्याचा संकल्प आखला आहे.
समाजाचे आपण काही तरी देणे असतो म्हणून वाकड येथील अवघ्या पंधरा वर्षाचा असणारा सम्यक सतीश वाघमारे याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाचा होणारा अनर्थ खर्च टाळुन समाजातील निराधार व गरजू अशा १०० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सम्यकचे वडील सतिश वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे, निलेश वाघमारे, स्वप्निल वाघमारे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
सम्यकने वाढदिवसानिमित्त अनर्थ खर्च टाळून त्याने दिलेला मदतीचा हात समाजात प्रेरणा देणारा आहे. तर १०० कुटुंबांना केलेल्या मदतीमुळे सर्व कुटुंबियांनी सम्यकचे आभार मानले. त्याच्या या संकल्पनेमुळे परिसरात कौतुक होत आहे.














