न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणा-या परराज्यातील ३५ नागरिकांना मध्य प्रदेशात त्यांचे मुळगावी जाणेकरीता वल्लभनगर एस.टी.डेपो येथून एस.टी.बसने सीमेपर्यंत पाठविण्यात आले.
यावेळी महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, एन.यु.एल.एम.चे व्यवस्थापक संजीव धुळम, समूह संघटक मनोज मरगडे, किर्ती वानखेडे, दत्ता गोईकर, नागेश मापारी, वल्लभनगर एस.टी.डेपोच्या सहाय्यक व्यवस्थापक पल्लवी पाटील, होमगार्ड रोशन जाधव उपस्थित होते.
पाठविण्यात आलेल्या ३५ परराज्यातील नागरिकांमध्ये १७ जण पिंपरी भाजी मंडई येथील तर १८ कमला नेहरू शाळेतील केंद्रावर रहात होते. एस.टी.मध्ये बसल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.














