न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- राजगुरुनगर शहराजवळील राक्षेवाडी येथे एक ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण पुण्यातील खासगी रुग्णालयात कामाला आहे. तो दिवसाआड राजगुरुनगर येथुन पुणे येथे कामाला जात होता. १२ मे रोजी या रुग्णाला ताप आला. राजगुरुनगर येथिल एका खासगी डॉक्टरकडे तो उपचार घेत होता. त्याला बरे न वाटल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच तालुका प्रशासनाला कळवण्यात आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. त्या व्यक्तीची पत्नी खेड येथिल सेझ मध्ये एका खासगी कंपनीत कामास होती. त्या कंपनीतील युनिट बंद करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या २९ महिलांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. खेड तालुका ग्रीन झोनमध्ये होता. रुग्ण आढळल्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.














