- रहाटणी व विकासनगर, किवळे मधील परिसर मध्यरात्रीपासून सील…
- खडकी व येरवड्यातील दोघांना कोरोनाची बाधा तर, येरवड्यातील एकाचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी आलेल्या अहवालानुसार नव्याने एका ४५ वर्षीय पुरुषाला व २५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण रहाटणी परिसरातील आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १८६ वर पोहोचला असून, महापालिकेच्या रुग्णालयात ६० रुग्ण उपचार घेत आहेत.
तसेच आज पुण्यातील खडकी व येरवडा येथील एका पुरुषाला व एका महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. आज पुन्हा येरवड्यातील एकाचा महापालिकेच्या रुग्णालयात उपचार चालू असतना मृत्यु झाला आहे.
आज रहाटणी येथील (नंदु जाधव उद्यान समोर-भिकोबा तांबे शाळा – भिकोबा तांबे शाळा – भिकोबा तांबे शाळा – नम्रता क्रिस्टल पार्क सोसायटी नंदु जाधव उद्यान समोर) आणि विकासनगर, किवळे येथील ( छत्रपती शिवाजी महाराज चौक – विकासनगर मेन रोड- सुहाना चिकन शॉप – गणेश मंदिर – वामन स्मृती हौसिंग सोसायटी – सुमन मंगल केंद्रासमोर – श्रीनगर रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक ) परिसर मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


















