न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- पवना नदीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार आज शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास थेरगाव पवना नदी घाटाजवळ उघडकीस आला.
अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. महिला अंदाजे ४० ते ४५ वर्षीय असून, तिच्या अंगावर हिरवी साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाउज आहे, अधिक माहितीसाठी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वाकड पोलिसांनी केले आहे.


















